वाहनांच्या बॅटऱ्या लांबविणारा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:25 IST2019-12-16T22:25:46+5:302019-12-16T22:25:58+5:30

जळगाव : ग्रामीण भागातील वाहनांची बॅटरी चोरुन त्याची विल्हेवाट लावणाºया विशाल विक्रम भोई (२०, रा.वाल्मिक नगर) या फरार आरोपीस ...

  Vehicle mesh | वाहनांच्या बॅटऱ्या लांबविणारा जाळ्यात

वाहनांच्या बॅटऱ्या लांबविणारा जाळ्यात

जळगाव : ग्रामीण भागातील वाहनांची बॅटरी चोरुन त्याची विल्हेवाट लावणाºया विशाल विक्रम भोई (२०, रा.वाल्मिक नगर) या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सोमवारी शनी पेठेतून ताब्यात घेतले आहे. चोरी प्रकरणी धरणगाव येथे गुन्हा दाखल असल्याने पथकाने त्यास धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विशाल भोई हा साथीदारांसोबत ग्रामीण भागात गावा बाहेर किंवा गावात लावलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरुन जळगाव येथे त्यांची विल्हेवाट लावत होता. अशाच एका चोरी प्रकरणी त्याच्या विरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल होता. यात विशाल याचा साथीदार व चोरीत वापरण्यात येणारी रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी विशाल भोई फरार होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहूल पाटील, अशोक पाटीलप्रमोद लाडवंजारी यांनी सापळा रचत विशाल यास शनी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बदाम गल्ली येथून ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करुन धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

Web Title:   Vehicle mesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.