कन्नड घाटाच्या कठड्याला वाहन धडकले, तीन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 22:46 IST2025-04-02T22:45:43+5:302025-04-02T22:46:16+5:30

पातोंडा येथील अतुल माळी हे परिवारातील २० जणांसह  बुधवारी पहाटे वाहनाने श्रीरामपूर येथे गेले होते.

Vehicle hits Kannada Ghat embankment, three killed in Jalgaon | कन्नड घाटाच्या कठड्याला वाहन धडकले, तीन जण ठार

कन्नड घाटाच्या कठड्याला वाहन धडकले, तीन जण ठार

- जिजाबराव वाघ

चाळीसगाव (जि. जळगाव)  : श्रीरामपूरहून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येणारी पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली.  या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले.  हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता घडला.  या वाहनात २० जण होते. 

या अपघातात सारजाबाई मधुकर माळी (६५), नाना दामू माळी (पातोंडा दोघे रा. पातोंडा ता. चाळीसगाव) आणि राहुल लक्ष्मण महाजन (गुढे, ता. भडगाव) हे तीन जण ठार झाले आहेत. 

पातोंडा येथील अतुल माळी हे परिवारातील २० जणांसह  बुधवारी पहाटे वाहनाने श्रीरामपूर येथे गेले होते. नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण  छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते. कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे हे वाहन संरक्षक कठड्यावर धडकले.  यात तीन जण जागीच ठार  तर  पाच जण जखमी झाले.  जखमींना तातडीने ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Vehicle hits Kannada Ghat embankment, three killed in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात