वरखेडी-भोकरी येथे कोरोनाच्या भीतीने गल्ल्या केल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:28 IST2020-03-30T16:27:35+5:302020-03-30T16:28:44+5:30

रविवारपासून गावातील सर्व गल्ल्यांमधे बाहेरील फेरीवाले विक्रेत्यांनी प्रवेश करू नये यासाठी विविध साधनांचा वापर करून गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत.

At Varkheedi-Bhokri, the corona fears closed | वरखेडी-भोकरी येथे कोरोनाच्या भीतीने गल्ल्या केल्या बंद

वरखेडी-भोकरी येथे कोरोनाच्या भीतीने गल्ल्या केल्या बंद

ठळक मुद्देफेरीवाल्यांना प्रवेश नाग्रामपंचायतीतर्फेही उपाययोजना

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक मात्र आता याबाबत गंभीर झालेले दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवारपासून गावातील सर्व गल्ल्यांमधे बाहेरील फेरीवाले विक्रेत्यांनी प्रवेश करू नये यासाठी विविध साधनांचा वापर करून गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत.
गावात विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हातपंपांच्या सहाय्याने विषाणू नाशकांची ग्राम पंचायतीतर्फे फवारणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रूग्णांना एक मीटर अंतराने बाहेर रांगेत उभे करून एक-एक रुग्णास मध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच त्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

Web Title: At Varkheedi-Bhokri, the corona fears closed