अमळनेरात आर्मी स्कूलमध्ये इंग्लिश डेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:21 PM2019-12-02T15:21:33+5:302019-12-02T15:23:34+5:30

'इंग्रजी भाषा शिकणे व आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ती परराष्ट्रीय भाषा असली तरी ही भाषा शिकणे, आत्मसात करणे म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे नव्हे'. यासाठी आर्मी स्कूलमध्ये सुरू असलेले इंग्रजी दृढ होण्यासाठी सुरू असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे एस.यु.पाटील यांनी सांगितले.

Various programs will be organized for English denomination at Army School in Amalner | अमळनेरात आर्मी स्कूलमध्ये इंग्लिश डेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

अमळनेरात आर्मी स्कूलमध्ये इंग्लिश डेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमध्ये सहभागविद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत

अमळनेर, जि.जळगाव : 'इंग्रजी भाषा शिकणे व आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ती परराष्ट्रीय भाषा असली तरी ही भाषा शिकणे, आत्मसात करणे म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे नव्हे'. यासाठी आर्मी स्कूलमध्ये सुरू असलेले इंग्रजी दृढ होण्यासाठी सुरू असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.यु.पाटील यांनी सांगितले.
'इंग्लिश डे'निमित्त आयोजित बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग उपप्रमुख शरद पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख उमेश काटे, इंग्रजी विभागप्रमुख संतोष पवार, इंग्रजी शिक्षक अनिल पाटील, सुनील नगराळे, संदीप बंछोडे, रुपाली पाटील उपस्थित होते.
शरद पाटील म्हणाले की, 'इंग्रजी भाषा शिकायची असेल तर ती जास्तीत जास्त श्रवण करा, शब्द भरणा वाढवा आणि छोटी छोटी वाक्य तयार करून बोलण्याचा प्रयत्न करा.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात 'इंग्लिश डे'चे उद्घाटन प्राचार्य एस.यु.पाटील यांनी केले.
अध्यक्षस्थानी सुभेदार मेजर नागराज पाटील होते. डी.झेड. महाजन, एस.ए. बाविस्कर, ए.टी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यात ड्रामा, डान्स, पोएम सिंगिंग, स्टोरी टेलिंग, फॅन्सी ड्रेस इ. कार्यक्रम होते. एस.ए.वाघ, प्राजक्ता शिंदे यांनी परीक्षण केले. चेतन पाटील व सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले तर स्वामी जंभोरे याने आभार मानले. एस.एन.महाले, व्ही.डी.पाटील, डी.एच.पाटील, ए. ए. वानखेडे, जी.पी.हडपे, संदीप ढोले, टी.के.पावरा, शिवाजी पाटील, एस.ए.पाटील, किरण पगार यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
गीत गायन स्पर्धा प्रथम- यश महाजन, द्वितीय आर्यन पवार, तृतीय- अनिकेत सपकाळे. कथाकथन स्पर्धा प्रथम- सावंत चव्हाण, द्वितीय- दुर्गेश जाधव, तृतीय- निखिल पाटील. फॅन्सी ड्रेस (लहान गट) प्रथम- युवराज अहिरे, द्वितीय- हर्षवर्धन बिºहाडे, तृतीय- नरेंद्र अहिरे. फॅन्सी ड्रेस (मोठा गट) प्रथम- प्रसाद पाटील. समूह नृत्य स्पर्धा प्रथम- वैभव सोनवणे ग्रुप, द्वितीय- कुवर ग्रुप, तृतीय- अभिजीत पाटील ग्रुप. नाटक स्पर्धा प्रथम- मयुर पाटील ग्रुप, द्वितीय- राठोड ग्रुप, तृतीय- ईश्वर पाटील ग्रुप. काव्यवाचन स्पर्धा प्रथम- पाचवी ब , द्वितीय सातवी अ, तृतीय- सहावी अ. संभाषण स्पर्धा प्रथम- आठवी अ, द्वितीय- मयूर पाटील ग्रुप. स्वपरिचय स्पर्धा प्रथम- दक्ष पाटील. शैक्षणिक साहित्य स्पर्धा प्रथम- गणेश गांगुर्डे, द्वितीय- वैभव सोनवणे, तृतीय- सावन चौहान. भित्ती फलक स्पर्धा प्रथम- सुरेश तडवी, द्वितीय जयेश न्याहळदे, तृतीय चेतन बोरसे.

Web Title: Various programs will be organized for English denomination at Army School in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.