शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

यावल येथे महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:08 PM

महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

यावल, जि.जळगाव :   महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्त्वअध्यात्मिक क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्व आहे. या परंपरेत महर्षी व्यास गुरूंच्या अग्रस्थानी आहेत. महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते. असे म्हणतात की, ‘व्यासोच्छीट जगत सर्व।’ (अर्थात जगातील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथम महर्षी व्यासानाच होते.) महर्षी व्यास हे गुरूंचे प्रतिनिधी आहेत. चार वेद, १८ पुराण व महाभारत रचयिते महर्षी व्यासांचे येथे भव्य मंदिर असून, गुरूपोर्णिमेस मोठा उत्सव साजरा केला जातो.आख्यायिकामहाभारत रचयिते श्री महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे. महाभारत काळात सातपुड्याचे घनदाट जंगल यावलपर्यंत होते, असे सांगितले जाते. सध्याच्या येथील हडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरीता-सरीता नद्या होत. या नद्यांच्या संगमानंतर वाहत असलेली सुर नदी ही दक्षिण वाहिनी आहे. याच नदीच्या उंच टेकडीवर लोमेश नावाच्या ऋषींंचा आश्रम होता. एकदा लोमेशांनी महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ आयोजित केला होता. त्याचवेळेस अज्ञानवासातून पांडव हस्तीनापुराकडे परतताना लोमेश ऋषींच्या आश्रमावर आले असता त्यांच्या हस्ते लोमेशांनी महर्षीना यज्ञासाठी निमंत्रित केले होते व महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ येथील भूमीत वास्तव्य केल्याचे व महाभारताची काही पर्वे लिहिली असल्याचे म्हटले जाते. महर्षी व्यास हे सप्त चिरंजिवापैकी एक होत. चिरंजीवी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. भारतात महर्षी व्यासांचे मुख्य स्थान बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर यावल येथेच असल्याने जिल्ह्यातील भाविक येथे गुरूपौर्णिमेस येवून गुरूंच्या चरणी लीन होतात.मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्ताने महर्षी व्यास मंदिरात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन आयोजित केले आहेत. महापूजेस सकाळी आठला प्रारंभ होईल. यात्रेनिमित्ताने मंदिर परीसरात माधवराव गोळवलकर रक्तपेढी व संस्थेतर्फे रक्तदान शिबिर तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल