शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:10 IST

भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनवोदय विद्यालय परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील घटनाअपघातात वरणगाव येथील वायरमन ठारमिनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. याबाबत मिनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ते वीज वितरण कंपनीत जळगाव येथे सेवारत होते.पोलीस सूत्रांनुसार, जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या मिनी ट्रक (एम.पी.०९ जी.ई.०७२९) ने मोटारसायकल (एम.एच.१९-सी.ई.७२७४) ला मागाहून जोरदार धडक दिली. यानंतर मोटारसायकल चालकाने समोरुन येणाºया चारचाकी (एम.एच.१९.एम.एच.३१३२) ला धडक दिली. यात मोटारसायकलचालक राजेंद्र श्रावण धनगर हे चारचाकीच्या खाली सापडले. यात धनगर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला. ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास येथील महामार्गावर नवोदय विद्यालयाच्या पुढे घडली. या अपघातात चारचाकी कारमधील एक प्रवासी जखमी झाला. त्यास गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत केली. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू असताना महामार्गाच्या कडेला खोलवर खोदाईचे कार्य सुरू आहे व यातच अपघात घडल्याने महामार्गावरील वाहनधारकांची मोठी पंचायत झाली. वाहनाच्या दुतर्फा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. शहर पोलीस स्टेशनचे शंकर पाटीत, प्रवीण ढाके, संजय बडगुजर तसेच वाहतूक शाखेचे लतीफ पठाण, भारत काळे, भाऊसाहेब पाटील, चालक सुनील शिंदे, राजेश वणीकर यांनी वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पीएसआय के.टी. सुरळकर करीत आहे. घटनेची माहिती मिळतातच वरणगाव येथील बबलू धनगरांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातBhusawalभुसावळhighwayमहामार्ग