शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

राममंदिरासाठी २३ वर्षे पायात बूट-चप्पल न घालणारे वै.नारायण महाराज जुनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 6:56 PM

अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.

मुक्ताईनगर : अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.मूळचे तांदुळवाडी सिध्देश्वर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा येथील रहिवासी संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रती, विणेकरी वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे अयोध्या आंदोलनात १९८६ पासून सहभागी झाले होते. तेव्हापासून २३ वर्षे २००८ पर्यंत पायात बूट, चप्पल अशी कोणतीही पादत्राणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात कधीच मरेपर्यंत घातली नाही. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शिलापूजन, कारसेवा आदी प्रत्येक लढ्यात उपक्रमात हिरीरीने सहभागी झाले. घराघरात लढा पोहचवला. विश्र्व हिंदू परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संत समिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांत आजीवन सदस्य ई. जबाबदारी सांभाळली होती. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राममंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र ओळख होती. श्रीरामपंत जोशी, राजेश जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृहकार्याचा गौरव अनेक वेळा करायचे. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत कारसेवेतसुध्दा अग्रेसर होते. कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशा लावल्या. त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांच्याकडे तीन महिने राहिले. आयुष्यभर आपल्या कीर्तन-प्रवचनात राममंदिर आंदोलन जनजागृती हा विषय असायचा. व्यासपीठ कुठले आहे कोणत्या पक्षाचे आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते. आपले रामजन्मभूमीविषयी विचार बेधडकपणे मांडायचे. नारायण महाराज यांची आई मुक्ताईवर विशेष निष्ठा होती. दरमहा वारीवर प्रल्हादराव पाटील यांची भेट व्हायची. भाऊ नेहमी म्हणत, बुवा किती दिवस अनवाणी फिरता घाला चप्पल त्या आजकाल चामड्याच्या नसतात पण? महाराज ठाम राहायचे.आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ किंवा खानदेशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा? राममंदिरवाले आहेत का? बूट घातला की नाही अजून? त्यांना म्हणा की बुट? घाला मोठेबाबांचा निरोप आहे परंतु गुरूंचीसुद्धा माफी मागत शेवटपर्यंत प्रतिज्ञा मोडली नाही. आयुष्याचे शेवटी शेवटी प.पू.भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होतांना पाहिले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या. आईसाहेब मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभूमी आंदोलनातील एक पणती होते. बुधवारी अयोध्येत राममंदिर भूमिपूजन झाले. या आनंदाच्या क्षणी महाराज आपल्यात नाहीत पण स्वर्गात नक्की आनंदात असतील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर