शहरात आज ९ केंद्रावर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:52+5:302021-09-13T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील महापालिकेचे आठ व रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर सोमवारी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू राहणार आहे. ...

शहरात आज ९ केंद्रावर लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महापालिकेचे आठ व रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर सोमवारी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू राहणार आहे. महापालिकेच्या केंद्रावर कोविशिल्ड लस पहिल्या व दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.
शहराला गेल्या वेळी २५ हजार डाेस देण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात आणखी डोस येणार असून तेही एक लाखांपेक्षा अधिक असतील अशी माहिती आहे. त्यामुळे यातून आता शहराला डोस मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, शाहीर अमरशेख रुग्णालय, काशीबाई उखाजी कोल्हे शाळा, पिंप्राळा मनपा शाळा, कांताई नेत्रालय आणि मुलतानी दवाखाना या केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे.