मुले पळविण्याच्या संशयावरून उत्तरप्रदेशातील महिलेला जळगावात घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:50 IST2019-09-24T12:49:27+5:302019-09-24T12:50:18+5:30

गुन्हे शोध पथक तिची चौकशी करीत आहे.

Uttar Pradesh woman arrested in Jalgaon on suspicion of kidnapping children | मुले पळविण्याच्या संशयावरून उत्तरप्रदेशातील महिलेला जळगावात घेतले ताब्यात

मुले पळविण्याच्या संशयावरून उत्तरप्रदेशातील महिलेला जळगावात घेतले ताब्यात

जळगाव : शहरातील तांबापुरा भागातून मुले पळवून नेत असल्याच्या संशयावरून मंगळवारी सकाळी उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथील एका महिलेला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनी भागातील एका शाळेत प्रार्थना सुरू असताना या महिलेने एका मुलाला बाजूला बोलविले. तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तिला जाब विचारला. मात्र ती समाधनकारक उत्तर देऊ शकली नाही. त्यामुळे लोकांनी तिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन तासांपासून गुन्हे शोध पथक तिची चौकशी करीत आहे.

Web Title: Uttar Pradesh woman arrested in Jalgaon on suspicion of kidnapping children