शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

By ajay.patil | Published: August 31, 2022 4:41 PM

पांढऱ्या सोन्याला यंदा मिळणार आणखीनच झळाळी : अमेरिकेची निर्यात कमी होणार, भारताची वाढण्याची शक्यता

अजय पाटील

जळगाव - गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला दमदार भाव मिळणार असून, अमेरिकेतील मुख्य लागवड होणाऱ्या टेक्सास, कॅलीफोर्नीया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के  घट होण्याचा अंदाज कॉटन मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणारी निर्यात कमी होवून, भारताला ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दमदार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातंर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला रेकॉर्डब्रेक भाव मिळाला. त्यामुळे अतीवृष्टीमुळे नुकसान होवूनही, शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यंदा देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेने भारतात देखील कापसाचा पेरा वाढला आहे. त्यात सध्यातरी अनेक भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कापसाची स्थिती चांगली आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकपटीने वाढणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असून, पहिल्याच मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ११ हजार १७५ रुपयांचा रेकॉर्डब्रेक भाव मिळाला आहे.

काय आहे कारण...

१. अमेरिका जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश असून, या देशात सुमारे २ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन केले जाते. तसेच या सर्व मालाची अमेरिकेकडून निर्यात केली जात असते.२. अमेरिकेतील टेक्सास, कॅलीफोर्नीया या मोठ्या राज्यांमध्ये देशातील एकूण कापूस लागवडीच्या सुमारे ५० टक्के उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा याच राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे.३. दुष्काळामुळे अमेरिकेच्या कापूस उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणाऱ्या निर्यातमध्ये घट होणार आहे.४. अशा परिस्थितीत चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे.

सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देशचीन - ५ कोटी गाठीभारत - ३ कोटी ५० लाख गाठीअमेरिका - २ कोटी ५० लाख गाठी

- चीनमध्ये जरी कापसाचे उत्पादन सर्वाधिक होत असले तरी हे उत्पादन चीनच्या मार्केटसाठी कमी पडते. त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करत असतो.- भारतात दरवर्षी ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन होत असते, मात्र यंदा भारतात कापसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा ३ कोटी ७० लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे.- अमेरिकेतील उत्पादन कमी होणार असल्याने, चीन, पाकिस्तान, व्हीएतनाम, बांग्लादेश यांना भारताकडून होणाऱ्या निर्यातीत वाढ करावी लागणार आहे.- त्यातच भारतातील सुत गिरण्या वेगाने सुरु असल्याने कापसाला देशातंर्गत  मागणी कायम राहणार असल्याने कापसाचे भाव वाढणार आहेत.

अमेरिका हा सर्वातमोठा निर्यातदार देश आहे. मात्र, त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने अमेरिकेतील उत्पादनात घट होणार आहे. त्याचा फायदा भारताला होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव देखील वाढतील.-हर्षल नारखेडे, कॉटन मार्केटचे अभ्यासक

टॅग्स :JalgaonजळगावcottonकापूसFarmerशेतकरी