शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात बेमोसमी पावसामुळे साथीचे आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:43 IST

मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये दिवसागणिक वाढउपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये, परिसरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ खबरदारीचे उपाय योजना करण्याची गरज आहे.अवकाळी पावसाने पावसाळ्यानंतरही थैमान घातले. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जगाच्या पोशिंद्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरदेखील पावसाचा परिणाम झाला आहे. भुसावळ शहरासह तालुक्यात टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत.दिवसागणिक या रोगांच्या रुग्णांची संख्या वाढतच आह.े लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. मात्र नगरपालिका व आरोग्य विभाग नागरिकांचे आरोग्य धोक्यात असूनसुद्धा तत्पर दिसत नसल्याची नागरिकांची व्यथा आहे.शहरातील अनेक नगरसेवकांनी स्व-खर्चाने आपल्या प्रभागांमध्ये धुरळणी केली आहे. या आजारांवर नियंत्रण न मिळाल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस थांबून येत असला तरी वातावरणाच्या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषत: लहान मुले व वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जीव घेणे साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने नगरपालिका व आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपाययोजना कराव्या याकरिता प्रशासनाला निवेदन दिले आहे.आमदारांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठकशहरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गल्ली-बोळात नागरिक साथीच्या आजारांनी बेजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय सावकारे यांनी पालिका प्रशासन व आरोग्य े अधिकारी यांना बोलावून तातडीने उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच शहरातील इतर गंभीर समस्यांविषयीही तत्काळ मार्ग काढण्यात यावा यासाठी आधीच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ