नोंदणी नसलेले वाहन रस्त्यावर येताच आरटीओने केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:00+5:302021-07-28T04:17:00+5:30
जळगाव : नवीन वाहन रस्त्यावर येण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे बंधनकारक असतानाही या नियमांना तिलांजली देऊन रस्त्यावर आलेली वाहने आरटीओकडून ...

नोंदणी नसलेले वाहन रस्त्यावर येताच आरटीओने केले जप्त
जळगाव : नवीन वाहन रस्त्यावर येण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे बंधनकारक असतानाही या नियमांना तिलांजली देऊन रस्त्यावर आलेली वाहने आरटीओकडून जप्त केली जात आहेत. गेल्या दोन दिवसात चारचाकी कार व दुचाकी अशी ५३ वाहने पथकाने जप्त केली आहेत. त्याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
कोणतेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी व क्रमांक दिल्याशिवाय वाहन रस्त्यावर येऊ नये यासाठी परिवहन विभागाने नियमावली केली आहे. आता तर वाहनाची नोंदणी व क्रमांक वितरीत करण्याचा अधिकारच वितरकांना देण्यात आलेला आहे, त्यावर आरटीओचे नियंत्रण राहिलेले नाही. असे असले तरी नोंदणी केल्याशिवाय वाहन ग्राहकाच्या ताब्यात देऊ नये हा नियम कायम आहे, असे असतानाही चारचाकी व दुचाकी रस्त्यावर दिसायला लागल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश निरीक्षकांना दिले आहेत. मोटार वाहन निरीक्षक दीपक साळुंखे, प्रशांत कंकरेज व घनश्याम चव्हाण यांच्या पथकाने नवीन बसस्थानक व इतर भागात कारवाईची मोहीम राबवून ही वाहने जप्त केली.