अविवाहित दिव्यांग गर्भवती तरुणी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:07 IST2018-08-26T13:07:06+5:302018-08-26T13:07:20+5:30
एका दिव्यांग तरुणीवर कोणी अत्याचार तर केला नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे

अविवाहित दिव्यांग गर्भवती तरुणी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल
जळगाव : जामनेर तालुक्यातील एका अविवाहीत दिव्यांग गर्भवती तरुणीस शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रविवारी तिचे सिझर करण्यात येणार आहे.
या बाबत वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका दिव्यांग तरुणीचे पोट दुखत असल्याने तिला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णलायात दाखल करण्यात आले. त्या वेळी रुग्णालयात तिची सोनोग्राफी केली असता ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. ही तरुणी अविवाहित असल्याचेही समोर आले आहे.
संध्याकाळी तिला असह्य वेदना होत असल्याने प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रात्रीपर्यंत प्रसूती न झाल्याने रविवारी तिचे सिझर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या अविवाहित दिव्यांग तरुणीस गर्भ राहण्याबाबत घरचे सर्वजण अनभिज्ञ आहेत. एका दिव्यांग तरुणीवर कोणी अत्याचार तर केला नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.