विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात चोरट्यांचा डल्ला, दोन महागडे टीव्ही लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:11 IST2020-02-16T13:11:10+5:302020-02-16T13:11:35+5:30
गुन्हा दाखल

विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात चोरट्यांचा डल्ला, दोन महागडे टीव्ही लांबविले
जळगाव : तळमजल्यावरील खिडक्या तोडून अज्ञात चोरट्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात प्रवेश करीत दोन महागडे टीव्ही चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ याप्रकरणी धरगणाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या शेजारी शिक्षणशास्त्र विभाग आहे़ दरम्यान, शुक्रवारी शिपायाने विभाग कुलूप बंद केले होते़ मात्र, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी विभागाच्या तळमजल्यावरील दोन लोखंडी खिडक्या तोडून जिन्यातून शिक्षणशास्त्र विभागात प्रवेश केला़ नंतर एका वर्गखोलीसह संगणक खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन्ही खोलीतून एक-एक असे दोन महागडे टीव्ही चोरून नेले़