शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पारोळा तालुक्यातील म्हसवेनजीक ग्रामसेवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:49 IST

वर्धमाननगरातील रहिवासी तथा रवंजे, ता.एरंडोल येथील ग्रामसेवक दिलीप काशिनाथ पाटील यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ते नाल्यात पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे२४ तासांनंतर मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळलाकारचा केला पाठलाग

पारोळा, जि.जळगाव : वर्धमाननगरातील रहिवासी तथा रवंजे, ता.एरंडोल येथील ग्रामसेवक दिलीप काशिनाथ पाटील यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ते नाल्यात पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. २३ रोजी घडना घडल्यानंतर २४ तासांनी त्यांचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला.सूत्रांनुसार, रवंजे, ता.एरंडोल येथे ग्रामसभेला ड्युटीवर जाण्यासाठी दिलीप काशिनाथ पाटील (५२) हे मोटारसायकल (एमएच-१९-डीई- ५२६९) ने २३ रोजी सकाळी ६ वाजता घरून निघाले होते. पारोळ्यापासून चार कि.मी. अंतरावर पारोळा-एरंडोल आशिया महामार्ग ४६ वर म्हसवे गावानजीकच्या पुलावरून जात असताना त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच-४३-बी-९८२०) ने जबर धडक दिली. ते मोटारसायकलवरून पुलावरून जंजनी नाला (धोबीघाट) पाण्यातील नाल्यात फेकले गेले. डोक्याला जबर मार लागला. पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून त्यांना रुग्णवाहिका चालक ईश्वर व यश ठाकूर, दीपक सोनार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. त्यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी ५ वाजता त्यांच्या मूळ गावी पिंप्री प्र. अ. ता.पारोळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.अपघाताबाबत विजय रमेश पाटील रा.म्हसवे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. प्रकाश चौधरी करीत आहे.घटनास्थळी फक्त मोटारसायकल असल्याने सर्व संभ्रमातग्रामसेवक दिलीप पाटील यांची अपघातस्थळी फक्त मोटारसायकल व थोड्या अंतरावर सोबत असलेली बॅग आढळली. ते अपघातस्थळी नाहीत. त्यांना उपचारासाठी धुळे येथे कोणी हलविले, अशी वार्ता त्यांच्या पत्नीच्या कानावर आली. त्यांनी तत्काळ धुळे गाठले. धुळे येथील सर्व खासगी व सरकार दवाखाने त्या माउलीने पालथे घातले. पण ते कोणत्याच दवाखान्यात ते आढळले नाही. तोपर्यंत रात्री बराच उशीर झाला होता. दुसºया दिवशी २४ रोजी मग सकाळी घटनास्थळाजवळील पुलाच्या खाली पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला. २४ तासापर्यंत मृतदेह हा या नाल्याच्या पाण्यात पडून होता.हातातील घड्याळ बंद पडले ६.२०लाअपघात झाला तेव्हा ग्रामसेवक पाटील हे २३ रोजी सकाळी ६ वाजता पुलावरून पाण्यात पडले. पाण्यात बुडून २० मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला असावा, हे त्यांच्या हातातील बंद पडलेल्या ६.२० ची वेळ सांगून गेली.पत्नीचा एकच आक्रोशपतीचा मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला. हे पाहून उपस्थितांचे मन हेलावले. मुलगा हा बाहेरगावी शिक्षण घेतो.कारचालकाचा पाठलागसकाळी अपघात झाला तेव्हा याच कॉलनीतील रहिवाशी असलेला एक मुलगा खाजगी गाडीने जळगावला निघाला होता. त्याने हा अपघात पाहिला. नेमका अपघात नेमका अपघात कोणाचा हे समजले नाही. तो मुलगा कारचालकाचा पाठलाग करीत एरंडोलपर्यंत गेला. कार नंबर घेत तो पोलिसांना कळविल्याची माहिती पुढे आली व तो कारचालक कोण याचा शोध पारोळा पोलीस घेत आहेत.दिलीप पाटील हे गतकाळात ग्रामसेवक सहकारी पतपेढीचे चेअरमन होते. काही काळ पारोळा तालुका ग्रामसेवक संघटनेचे महत्त्वाचे पद सांभाळत नेतृत्व केले होते.

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा