युजीसीने परीक्षांबाबत अंतिम निर्णय द्यावा ; फार्मसी स्टुडंस् कौन्सिलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:50 IST2020-07-18T19:50:41+5:302020-07-18T19:50:52+5:30

जळगाव : अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही, याबाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम ...

The UGC should make the final decision on the final year exams; Demand of Pharmacy Students Council | युजीसीने परीक्षांबाबत अंतिम निर्णय द्यावा ; फार्मसी स्टुडंस् कौन्सिलची मागणी

युजीसीने परीक्षांबाबत अंतिम निर्णय द्यावा ; फार्मसी स्टुडंस् कौन्सिलची मागणी

जळगाव : अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही, याबाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम निर्णय द्यावा, अशी मागणी फार्मसी स्टुडंस् कौन्सिलतर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाला निवेदन पाठवून केली आहे़
राज्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ त्यातच राज्य सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्रव्यवहार सुध्दा केले आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात़ तसेच त्याबाबत अंतिम निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे़ निवेदनावर अध्यक्ष भूषण भदाणे, सुरज शरनाथे, अक्षर राऊत, दर्शन बोढारे, स्वप्निल हिरे, माणिक मोरे, प्रत्यूम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़

 

 

Web Title: The UGC should make the final decision on the final year exams; Demand of Pharmacy Students Council