अत्याचार प्रकरणाचे निवेदन देणाऱ्यासाठी जाणारे पाळधीचे दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:29 IST2018-04-18T19:29:05+5:302018-04-18T19:29:05+5:30
जळगाव- औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात एक जण जखमी

अत्याचार प्रकरणाचे निवेदन देणाऱ्यासाठी जाणारे पाळधीचे दोन तरुण ठार
आॅनलाईन लोकमत
पाळधी, ता.जामनेर,दि.१८ - कठुआ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन देण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला बुधवारी सकाळी ११.३० वाजता अपघात झाला. त्यात दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य एक जण जखमी झाला आहे.
पाळधी येथील शाहरूख इब्राहिम तडवी (वय २१), सादिक हकीम तडवी (वय २० ) व सिकंदर बाबू तडवी हे कठुआ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन देण्यासाठी पहूर येथे आले होते. तिघे तरुण मोटारसायकलने पहुर येथून परत येत असताना पाळधी गावाजवळच ४०७ ट्रक चालक (क्र.एमएच १९/३३९५) ओव्हरटेक करण्याच्या नांदात जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल वरील तिघे जण गंभीर जखमी झाले. प्रथम त्यांना गावातीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना जबर मार लागलेला असल्याने डॉक्टरांनी जळगाव येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना जळगाव येथे जिल्हा सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता शाहरूख इब्राहिम तडवी (वय २१) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर काही वेळेत सादिक हकीम तडवी (वय 20 ) याचाही मृत्यू झाला. अपघातात तिसरा तरुण सिकंदर बाबू तडवी हा गंबीर जखमी आहे. धडक देणारा ट्रक हा पहुर पासून पुढे एक किमी अंतरावर पकडण्यात आला. ट्रक चालक हा पहुर पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.