जळगावच्या कांताई बंधा-यात दोन तरुण बुडाले; एक बचावला, दुसरा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 20:40 IST2020-07-19T20:38:30+5:302020-07-19T20:40:59+5:30

तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधा-यात पाय निसटल्याने दोन तरुण बुडाले. त्यात एक बचावला असून दुसरा तरुण बेपत्ता आहे. चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) याचा उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता तर सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) याला वाचविण्यात यश आले आहे. रविवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली. 

Two youths drowned in Jalgaon's Kantai dam; One survived, the other disappeared | जळगावच्या कांताई बंधा-यात दोन तरुण बुडाले; एक बचावला, दुसरा बेपत्ता

जळगावच्या कांताई बंधा-यात दोन तरुण बुडाले; एक बचावला, दुसरा बेपत्ता

ठळक मुद्देधानोरा शिवारातील घटनारात्री आठ वाजता थांबविले शोध कार्य

जळगाव : तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधा-यात पाय निसटल्याने दोन तरुण बुडाले. त्यात एक बचावला असून दुसरा तरुण बेपत्ता आहे. चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) याचा उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता तर सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) याला वाचविण्यात यश आले आहे. रविवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली. 
 रविवारी सुट्टी असल्याने कांचन नगरातील पाच तरुण धानोरा, ता.जळगाव शिवारातील कांताई बंधा-यात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी साडे तीन वाजता बंधाºयाच्या काठावर असताना पाण्याच्या प्रवाहाने चेतन व सागर यांचा पाय निसटला आणि त्यात दोघंही वाहिले.  सागर याने आरडाओरड केल्याने मित्रांनी त्याला वाचविण्यात यश आले तर चेतन हा सापडलाच नाही. रात्री आठ वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली. चेतन हा रेडीमेड कपडे विक्री करुन वडीलांना मदत करायचा. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो बॅँक आॅफ महाराष्ट्रमध्ये कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हळणोर, विलास पाटील,पोलीस पाटील पूनम सोनवणे, देवराम सोनवणे, तलाठी सारीका दुर्मळ आदी उशिरापर्ययत घटनास्थळावर थांबून होते.

Web Title: Two youths drowned in Jalgaon's Kantai dam; One survived, the other disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.