स्टीलचा ग्लास मागितल्यावरून दोन महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:03 IST2018-10-21T23:00:38+5:302018-10-21T23:03:00+5:30
स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले.

स्टीलचा ग्लास मागितल्यावरून दोन महिलांना मारहाण
एरंडोल : स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले. त्यात कल्पना रामू चव्हाण (२३) यांना लाकडी दांडा मारल्याने त्या जखमी झाल्या तर भांडण सोडविण्यास सासू शारजाबाई चव्हाण (६०) गेल्या असता त्यांना ढकलून देण्यात आले व त्याही खाली पडल्याने जखमी झाल्या.
सासू व सून दोन्ही जखमी झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी खेडगावतांडा येथे झाली. शारजाबाईने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपी समाधान पवार यांच्याविरुद्ध भाग पाच गुरनं.७५/१८ भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी, सहाय्यक फौजदार अशोक मोरे, राहुल बैसाणे, श्रीराम पाटील हे पुढील तपास करीत आहेत.