अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:37 IST2019-04-20T12:37:28+5:302019-04-20T12:37:57+5:30

जळगाव : मुक्ताईनगर येथून काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप शांताराम चांदेलकर (३५,रा़ रामेश्वर कॉलनी) ...

Two wheelers killed in unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : मुक्ताईनगर येथून काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप शांताराम चांदेलकर (३५,रा़ रामेश्वर कॉलनी) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ घडली़ सुदैवाने दुचाकीवर मागे बसलेला मित्र रवींद्र शांताराम कोळी (रा़ रामेश्वर कॉलनी) किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़
संदीप चांदेलकर हा कुटूंबियांसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यात होता़ घरा शेजारीच मित्र रवींद्र हा राहतो. दोघे जण मार्बलचे कारागिर असल्यामुळे दोन्ही सोबतच काम करायचे़ शुक्रवारी मुक्ताईनगर येथील काम मिळाल्याने दोघेही दुचाकीने मुक्ताईनगर गेले होते़ रात्री काम आटोपल्यानंतर दोघे दुचाकीने परतीच्या मार्गावर निघाले़ दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास महामार्गाजवळील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ यामध्ये संदीप याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर रवींद्र हा किरकोळ जखमी झाला़
कुटूंबियांचा प्रचंड आक्रोश
संदीप याचा मृत्यू झाल्याची बातमी कुटूंबियांना कळताच त्यांनी प्रंचड आक्रोश केला़ जिल्हा रूग्णालयात आई तसेच पत्नी यांनी हंबरडा फोडला़
मृतदेह जागेवर पडून
अपघातानंतर मृतदेह तब्बल पाऊण ते एक तास महामार्गावरच पडून होता़ त्यामुळे महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती़ अखेर एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा रूग्णालयात नेला़ यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप यास मृत घोषित केले़

Web Title: Two wheelers killed in unknown vehicle

टॅग्स :Jalgaonजळगाव