भरधाव कंटेरनच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:58 IST2019-09-16T23:57:25+5:302019-09-16T23:58:06+5:30
जळगाव - शिवकॉलनीकडून प्रभात चौकाकडे जात असलेल्या सत्यम राजेंद्र पाटील (वय-१८ रा़ रामानंदनगर परिसर) या तरूणाला गॅस कंटेनरने जोरदार ...

भरधाव कंटेरनच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जखमी
जळगाव- शिवकॉलनीकडून प्रभात चौकाकडे जात असलेल्या सत्यम राजेंद्र पाटील (वय-१८ रा़ रामानंदनगर परिसर) या तरूणाला गॅस कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९़३० वाजता घडली़ या तरूण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
रविवार सुट्टी असल्याने मित्रांसोबत असलेला सत्यम राजेंद्र पाटील हा शिवकॉलनीकडून प्रभात कॉलनीकडे दुचाकी क्रमांक (एमएच़ १९़ सीएस़ ०१२६) ने जात असताना रात्री ९़३० वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या गॅस कंटेनर क्रमांक (जीजे़०६़एएक्स ५०९०) ने जोरदार धडक दिली. यात सत्यम हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर चालकासह गॅस कंटेनर जिल्हा पेठ पोलीसात जमा करण्यात आले आहे. कं टेनर चालक मोबीन खान माहम्मद अय्यूब (वय-३०, मानधाटा, ता़ पट्टी़ जि़ प्रतापगड, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.