भुुसावळ बसस्थानक परिसरात दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:15 IST2020-12-29T16:14:22+5:302020-12-29T16:15:17+5:30

दुचाकी चोरट्यास पोलिसांनी अटक केली.

Two-wheeler thief arrested in Bhusawal bus stand area | भुुसावळ बसस्थानक परिसरात दुचाकी चोरट्यास अटक

भुुसावळ बसस्थानक परिसरात दुचाकी चोरट्यास अटक

भुसावळ :  शहरात बसस्थानक भागात गस्त घालत असताना बाजारपेठ पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या दुचाकीस्वारास चौकशी केली असता, ही दुचाकी चोरीची असल्याची सांगितल्याने त्यास दुचाकीसह पोलिसांनी अटक केली आहे.
बसस्थानक परिसरात राम मुकेश करोसिया (वय-21,रा.भवानी नगर, नशिराबाद) याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकलवर संशयित वाटल्याने त्यास गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारपूस केली. समाधानकारक उत्तर देत नव्हता. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचना वरून न्यायालयाकडून तपासाबाबत परवानगी घेऊन गाडीबाबत तपास करीत असताना ही याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चोरीबाबत गुन्हा दाखल आहे. 
संशयित आरोपी राम मुकेश करोसिया यास पुढील तपासासाठी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पो.ना. विजय पोहेकर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, अनिल मोरे,  मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे यांनी केली आहे.

Web Title: Two-wheeler thief arrested in Bhusawal bus stand area