दुचाकीला कालीपिलीची धडक; लोहाऱ्याचे माजी सरपंच ठार, अंगणवाडीसेविका जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:31 IST2018-05-12T12:31:49+5:302018-05-12T12:31:49+5:30
जखमी महिलेला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आले

दुचाकीला कालीपिलीची धडक; लोहाऱ्याचे माजी सरपंच ठार, अंगणवाडीसेविका जखमी
आॅनलाइन लोकमत
जामनेर, जि. जळगाव, दि. १२ - भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे लग्नाला जाणा-या दुचाकीस कालीपिलीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लोहार, ता. पाचोरा येथील माजी सरपंच विठ्ठल दौलत क्षिरसागर (५५) हे ठार झाले तर मागे बसलेल्या अंगणवाडी सेविका निर्मला गणेश चौधरी या जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी जामनेर-भुसावळ रस्त्यावर कु-हा गावानजीक झाला.
जखमी महिलेला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आले.