शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जळगावात दुचाकीस्वार बहिण-भावाला ट्रकने उडविले; दैना झालेल्या साईडपट्टीने घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 12:56 IST

महामार्गावर पुन्हा अपघात

ठळक मुद्देभाऊ बालंबाल बचावलादवाखान्यातून उपचार करुन येताना अपघात

जळगाव : दवाखान्यात उपचार करुन भावासोबत दुचाकीने घरी जात असलेल्या सुरेखा सुभाष सनेर (वय ४३, रा. श्रीसमर्थ नगर, खोटे नगर, जळगाव) या महिलेला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता राष्टÑीय महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपनजीक घडली. या अपघातात भाऊ विकास भटू सोनवणे हे बालंबाल बचावले असून ते जखमी झालेले आहेत.दैना झालेल्या साईडपट्टीवरुन महामार्गावर चढत असताना दुचाकी घसरल्याने विलास हे रस्त्याच्याकडेला तर मागे बसलेली बहिण सुरेखा या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून महामार्गावर सतत अपघात सुरु असून निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. महामार्गावरील भरधाव वाहने नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. असे असतानाही प्रशासन उपाययोजना करताना दिसत नाही.अपघातामुळे वाहतुकीची कोंडीमहामार्गावर अपघात झाल्याचे समजल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे सुरक्षा रक्षक विजय काळे यांनी जिल्हा पेठचे निरीक्षक सुनील गायकवाड व रामानंदचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना घटना कळविली. त्यानंतर गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह मालवाहू वाहनातून जिल्हा रुग्णालयात रवाना केला. या अपघातामुळे आकाशवाणी व खोटे नगरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. मानराज पार्क पासून तर विद्युत कॉलनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सागर शिंपी व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रक चालक रामलाल नाईक (रा.बिकानेर, राजस्थान) व क्लिनर डुंगरदास चंदनदास रा.जोधपूर) या दोघांना पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर दोघांनी पळ काढला होता, मात्र जमावाने पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.सुरेखा सनेर यांचे संघर्षमय जीवनसुरेखा सनेर यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. लग्नानंतर मुलगी गायत्री ही सहा महिन्याची असतानाच पती-पत्नीत वाद झाले. त्यादिवसापासून दोन्ही पती-पत्नी विभक्त रहात होते. सुरेखा या भावाकडेच रहात होत्या. मुलगी गायत्री (वय २०) ही पुणे येथे नोकरीच्या शोधासाठी गेलेली आहे. पितृछत्र हरपलेल्या गायत्रीला आई सुरेखा यांनीच पित्याचीही माया लावली. भाऊ विकास हे महावितरण कंपनीत तर लहान भाऊ राहूल हे पिंप्री, ता. धरणगाव येथे जि.प.च्या शाळेत शिक्षक आहेत. सुरुवातीपासूनच संघर्ष करीत असलेल्या बहिणीचा असा मृत्यू ओढवून परमेश्वराने ही वेळ आणली...असा आक्रोश भाऊ राहूल हे करीत होते. ग.स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शरद पाटील व अन्य सहकारी त्यांना धीर देत होते.क्षमता ५ हजार वाहनांची, वापर ३५ हजार वाहनांचाशहरातून जाणाºया या महामार्गावरुन दिवसाला पाच हजार वाहने वापरण्याची क्षमता आहे, प्रत्यक्षात या महामार्गावरुन दिवसाला तब्बल ३५ हजार वाहनांचा वापर आहे. याशिवाय शहराची लोकसंख्या कमालीची वाढली असून वाहनांच्याही संख्येत भर पडली आहे. आज प्रत्येक घरात व्यक्तीनिहाय वाहने आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाºया तरुणांजवळही महागड्या दुचाकी आढळून येत आहे.गुजराल पेट्रोल पंपाजवळ घसरली दुचाकीसाईडपट्टयामुळे शिव कॉलनीजवळ सुरेखा सनेर यांची जीव गेल्यानंतर सायंकाळी महामार्गावरच गुजराल पेट्रोल पंपाजवळ साईडपट्टीवरुन दुचाकी (क्र.एम.एच.१९ जे.एल.४४५८) घसरली.त्यात विश्वजीत चौधरी व त्यांची पत्नी मिनाक्षी हे दोघं जण रस्त्याच्यकडेला फेकले गेले. त्याआधीही एक दुचाकी याच ठिकाणी घसरली होती.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव