दोन दुचाकी अपघातात एकाला चारचाकीने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:18 IST2019-07-10T23:16:34+5:302019-07-10T23:18:40+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले बाळू वामन धनगर (४५, रा.करंज, ता. जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजता तालुक्यातील ममुराबाद- विदगाव रस्त्यावर घडली. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन दुचाकी अपघातात एकाला चारचाकीने चिरडले
जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले बाळू वामन धनगर (४५, रा.करंज, ता. जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजता तालुक्यातील ममुराबाद- विदगाव रस्त्यावर घडली. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करंज येथील शेतमजूर असलेले बाळू धनगर हे बुधवारी रात्री दुचाकीने जळगावातून बाजार करुन घरी जात असताना ममुराबाद -विदगाव दरम्यान असलेल्या वळणावर समोरुन येणाºया दुचाकीची धनगर यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी बाळू धनगर हे रस्त्यावरच पडल्याने मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या धनगर यांना चिरडले. गाडीचे मागील चाक धनगर यांच्या चेहºयावरुन गेल्याने पूर्णपणे विद्रुप झाला होता. रस्त्यावरुन वापरणाºया लोकांनी धनगर यांना ओळखले. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दुसºया जखमी तरुणाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखमी युवक हा तुरखेडा येथील रहिवाशी असून बस कंडाक्टर असल्याचे समजते.धनगर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.