कला वसंतनगरातून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 22:04 IST2019-10-25T22:03:41+5:302019-10-25T22:04:14+5:30
जळगाव - घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेली महादेव विठ्ठल भोळे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ...

कला वसंतनगरातून दुचाकी चोरी
जळगाव- घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेली महादेव विठ्ठल भोळे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेटजवळ कला वसंतनगरात उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव विठ्ठल भोळे हे आसोदा रेल्वेगेटजवळील कला वसंतनगरातील कुटूंबासह वास्तव्यास आहेत़ त्यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे गुरूवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या मालकीची (क्रमांक एम.एच.१९ डी.जी. ८६२२) ही दुचाकी घराच्या वॉलकम्पाऊंडमध्ये पार्कींग केली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर कंपाऊंडचे गेट उघडून सदर दुचाकी लंपास केली. शुक्रवारी सकाळी भोळे यांना जाग आली असता त्यांना कंपाऊंडमध्ये दुचाकी दिसली नाही. नंतर त्यांनी परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही.