बनावट तंबाखू प्रकरणातील ‘त्या’ दोघांची रवानगी जळगाव सबजेलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 22:36 IST2021-05-12T22:36:28+5:302021-05-12T22:36:57+5:30
बनावट तंबाखू प्रकरणी पोलीस कोठडीतील त्या दोघा आरोपींची रवानगी जळगाव सबजेलमध्ये करण्यात आली आहे.

बनावट तंबाखू प्रकरणातील ‘त्या’ दोघांची रवानगी जळगाव सबजेलला
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : बनावट तंबाखू प्रकरणी पोलीस कोठडीतील त्या दोघा आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानंतर दोघांची रवानगी जळगाव सबजेलमध्ये करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ९ रोजी इरफान अक्रमबेग मिर्झा व रिजवान शेख नजीर या दोघांना पोलिसांनी त्यांच्या घरीच अटक केली होती. ११ रोजी न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांचा जामीन अर्जही फेटाळला होता. पोलिसांनी त्या दोघांची आरोग्य तपासणी करून त्याचा अहवाल आल्यानंतर आरोपींची रात्री जळगाव सबजेलमध्ये रवानगी केली. याप्रकरणी संबंधित कंपनी मालकाचा ही जबाब पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात आले.यातून बरीचशी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.