दोन गोदाम आणि एक गॅरेज खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 20:32 IST2021-03-26T20:32:48+5:302021-03-26T20:32:54+5:30
भुसावळातील घटना विजेची तार तुटल्या लागली आग ; लाखोंचे नुकसान

दोन गोदाम आणि एक गॅरेज खाक
भुसावळ : विजवाहक तार तुटल्याने मोटार गॅरेज आणि बांधकाम गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना येथील खडका रोडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर २६ रोजी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास घडली. पालिकेच्या तीन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.
वृत्त असे की, शहरातील खडका रोडजवळ शेख अजगर उर्फ अज्जू यांचे महाराष्ट्र ऑटो गॅरेज तसेच सलमान मुस्ताक कुरेशी यांचे बांधकाम साहित्याचे गोदाम तसेच अन्य एक गोदाम आहे. या ठिकाणी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विजवाहक तार तुटल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगीमुळे गॅरेजमधील साहित्यासह बांधकाम साहित्याच्या गोदामातील सेंट्रीग साहित्य, बल्ली, तार तसेच नजीकच्या गोदामातील पुठ्ठे व रद्दी खाक झाली. या घटनेनंतर नागरीकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली असलीतरी लाखोंचे साहित्य मात्र खाक झाले आहे.