जळगाव शहरातील महामार्गावर अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:01 IST2018-04-15T21:01:13+5:302018-04-15T21:01:13+5:30
रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. दरम्यान, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील महामार्गावर अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरुण ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. दरम्यान, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयुर हा रविवारी सायंकाळी गुजराल पेट्रोल पंपाकडून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एल.८८८४) शहराकडे येत असताना महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ रिक्षाचा त्याच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक (क्र.आर.जे.११ जी.ए.५८४०) त्याच्या अंगावरुन गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.
तरुण धावले मदतीला
अपघात झाल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मयुर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, त्यामुळे अनेक जण फक्त घटना बघत होते, परंतु मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विवेक ठाकरे, प्रशांत सुर्वे, धीरज सूर्यवंशी, पौरस चौधरी व गौरव पाटील आदी तरुणांचा गट तातडीने घटनास्थळी धावला. या तरुणांनी मयुर याला उचलून रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषीत केले.