पारोळ्यातील चोरीप्रकरणी दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 16:13 IST2020-01-11T16:11:53+5:302020-01-11T16:13:06+5:30

एन.ई.एस.हायस्कूलमधून चोरीस गेलेले संगणक, प्रिंटर चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Two suspects in custody for parole robbery | पारोळ्यातील चोरीप्रकरणी दोघे संशयित ताब्यात

पारोळ्यातील चोरीप्रकरणी दोघे संशयित ताब्यात

ठळक मुद्देएन.ई.एस. हायस्कूलमधील संगणक व प्रिंटर चोरी प्रकरणपोलिसांनी लावला तपासचोरीस गेलेले साहित्य हस्तगत

पारोळा, जि.जळगाव : शहरातील एन.ई.एस.हायस्कूलमधून चोरीस गेलेले संगणक, प्रिंटर चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेले साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
गेल्या महिन्यात २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेचा कडी-कोंडा, कुलूप तोडून संगणक, प्रिंटर, सिपीयू असे ४२ हजार ६०० रुपये किमतीचे शालेय साहित्य चोरुन नेले. याबाबत मुख्याध्यापक प्रदीप काशिनाथ सोनजे यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या चोरीतील आरोपींना सापळा रचून पकडले.
पारोळा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पो.काँ. पंकज राठोड, सुनील साळुंखे, किशोर भोई या पथकाने १० रोजी गुप्त माहितीच्या आधारे पारोळा शहरातील दोघा अल्पवयीन मुलांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, माहिती काढत असताना ११ रोजी पारोळा शहरातील धरणगाव चौफुलीवर एक संशयित उभा असल्याचे समजले म्हणून त्या ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेतले. त्याचा एक मित्रदेखील या चोरीत सहभागी असल्याचे समजले. दुसऱ्यासही ताब्यात घेतले. दोघांची विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे.
पुढील तपासासाठी दोघांंना तपास अधिकारी पो.हे.काँ. किशोर पाटील यांच्या ताब्यात दिले आहे. दोघांनी आणखी कुठे चोºया केल्या आहेत काय, याची माहिती पोलीस घेत आहेत.

Web Title: Two suspects in custody for parole robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.