चाळीसगाव तालुक्यात कार - दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:23 IST2018-05-10T13:23:44+5:302018-05-10T13:23:44+5:30
आडगाव ते टाकळी दरम्यान अपघात

चाळीसगाव तालुक्यात कार - दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी
आॅनलाइन लोकमत
आडगाव, जि.जळगाव, दि. १० - बोअरींगचे काम करण्यासाठी दुचाकीवर जात असताना समोरुन येणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात राहुल लहू मोरे (२१, रा. आडगाव, ता. चाळीसगाव हा दुचाकीचालक ठार झाला तर इतर दोन जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आडगाव ते टाकळी गावांदरम्यान झाला.
राहुल मोरे व त्याचा लहान भाऊ गोपाल मोरे (१८) हे बोअरींगचे काम करण्यासाठी दुचाकीने आडगावकडून टाकळीकडे जात होते. त्या वेळी समोरून येणाºया कारने धडक दिली व कारही उलटली. या अपघातात दुचाकीवरील दोघं भावांसह कारचालक समाधान सोपान बागूल (२१) हेदेखील जखमी झाले. त्यांना चाळीसगाव येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.