खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणात दोन जण शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:02 IST2020-01-22T13:02:13+5:302020-01-22T13:02:26+5:30
जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याचे साथीदार राकेश चंदू आगरिया ...

खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणात दोन जण शरण
जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याचे साथीदार राकेश चंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर, जळगाव) व निलेश नंदू पाटील (२४, ह. रा. कोल्हे यांचे घर, मुळ रा.फागणे, ता.धुळे) हे दोघं जण मंगळवारी पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी माजी महापौर ललित कोल्हे व आणखी चार जण फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणात १० ते १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यावेळी घटनास्थळी अनेक प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होते, मात्र घटनाक्रम सांगण्यास किंवा लेखी जबाब द्यायला कोणीही तयार होत नसल्याचा अनुभव पोलिसांना येत आहे.
दरम्यान, साहित्या यांच्यावर काय उपचार करण्यात आले. कोणत्या चाचण्या केल्या व त्यात काय निष्पन्न झाले, याचे कागदपत्र घेण्यासाठी पोलीस मुंबईला गेले आहेत.