तोंडापूर रस्त्यावर तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:17 IST2017-12-19T17:11:31+5:302017-12-19T17:17:08+5:30
भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी व रिक्षातील सहा प्रवासी जखमी.

तोंडापूर रस्त्यावर तिहेरी अपघातात दोन जण गंभीर जखमी
आॅनलाईन लोकमत
तोंडापूर, ता.जामनेर, दि.१९ : फदार्पूर रस्त्यावर वरखेडी गावाजवळ सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तीन वाहनांचा अपघात होऊन सहा जण जखमी झाले आहे. .
तोंडापूर येथून फर्दापूरकडे प्रवासी भरून निघालेली ठाणा, ता.सोयगाव येथील अॅपे रिक्षा तर कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर येथून कामगार कामासाठी फदार्पूरकडे दुचाकीने जात होती. फदार्पूर कडून येणाºया कार चालकाने भरघाव वेगाने येऊन समोरच्या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. मोटरसायकलचा जागीच चुराडा होऊन चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. तर अॅपे रिक्षा पलटी होऊन त्यातील प्रवाशीही गंभीर जखमी झाले आहे. जखमीमध्ये दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर कारचालक गाडी सोडून फरार आहे. या अपघातात हौसाबाई आबा जोशी (५५, रा.कुंभारी बुद्रुक), आसाराम लहानू जोशी (२८, रा.कुंभारी बुद्रुक) जे जखमी झालेले आहेत. या प्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती.