वाकडी प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 13:14 IST2018-06-16T13:14:37+5:302018-06-16T13:14:37+5:30

रामदास आठवले यांची वाकडी येथे भेट

Two more people were arrested in the case | वाकडी प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

वाकडी प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

पहूर, जि. जळगाव - वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री अजित कासम तडवी व शकूर सरदार तडवी (दोघे रा. वाकडी, ता. जामनेर) या दोन जणांना पहूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या चार झाली आहे. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले, माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शनिवारी वाकडी येथे भेट दिली.
वाकडी येथे विहीरीत पोहल्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली होती. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाकडी भेटीदरम्यान रामदास आठवले यांनी मारहाण झालेल्या मुलांना प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली. तसेच वैयक्तिक २५ हजार रुपयांची मदत त्यांनी दिली. ही घटना निंदणीय असून यात राजकारण करू नये, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Two more people were arrested in the case