मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:36 IST2020-02-23T12:35:22+5:302020-02-23T12:36:06+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

Two men arrested for stealing mobile phones | मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक

मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक

जळगाव : शिवकॉलनी येथील रहिवासी रवींद्र साळी यांच्या घरातून मोबाईल लांबविल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमजद खान इब्राहीम खान (४३) व शेख वसीम शेख सलीम (२५, दोन्ही रा़ भुसावळ) यांना अटक केली आहे़ त्यांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़
१४ जानेवारीच्या पहाटे खिडकीतून हात टाकून रवींद्र साळी यांच्या घरात टीपॉयवर ठेवलेला सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला होता़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अखेर याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अमदज खान व वसीम शेख या दोघांना भुसावळ येथून अटक केली आहे़ त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़ प्राथमिक तपास विश्वनाथ गायकवाड करीत आहेत़

Web Title: Two men arrested for stealing mobile phones

टॅग्स :Jalgaonजळगाव