Two men arrested for illegally selling alcohol | अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक
अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव- रामेश्वर कॉलनी व एमआयडीसी परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाºया दोन तरूणांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून दोघांकडून एकूण ९ हजार २३६ रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़
रामेश्वर कॉलनी येथील हॉटेल सागर ढाब्याच्या आढोश्याला सोमनाथ दामू सोनवणे (रा़ रामेश्वर कॉलनी) तर एमआयडीसी परिसरातील हॉटेल सुमरेसिंगच्या बाजूला भूषण ज्ञानेश्वर पाटील (रा़ मन्यारखेडा) हा अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना मिळाली होती़ त्यांच्या माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी संभाजी पाटील, आनंदसिंग पाटील, अतुल पाटील यांनी दोन्ही ठिकाणी धाड टाकली़ यावेळी अवैधरित्या दारू विक्री करणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे़ सोमनाथ सोनवणे कडून ४ हजार ३४६ रूपयांची दारू तर भूषण पाटील याच्याकडून ४ हजार ८९० रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़ तसेच दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Two men arrested for illegally selling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.