शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शिक्षिकेच्या घरातून लांबविले सव्वा दोन लाखाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:19 PM

अनुराग स्टेट बॅँक कॉलनीतील घटना : चार संशयित ताब्यात

जळगाव : महाबळ परिसरातील अनुराग स्टेट बॅक कॉलनीतील परीस हाईटस्मध्ये राहणाऱ्या स्मिता राजेश शिंदे यांच्या घरातून २ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयित म्हणून पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.परीस हाईटस्मध्ये राजेश भास्कर शिंदे हे पत्नी, मुलगी व मुलांसह वास्तव्यास आहेत. शिंदे रेमंड कंपनीत नोकरीला तर त्यांची पत्नी स्मिता या सेंट जोसेफ विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी आहेत. दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. शिंदे यांनी वर्षभरापासून घर कामासाठी पल्लवी पद्माकर चव्हाण (रा. वंजारी टेकडी, समता नगर) यांच्यासह त्यांच्या मुलींना कामावर ठेवले आहे. दरम्यान, त्यांना पो.कॉ.शरद पाटील व सहकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.वटसावित्रीच्या पूजेच्या तयारीदरम्यान प्रकार उघडस्मिता शिंदे यांनी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता १ लाख २० हजार रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाच्या ६ सोन्याच्या बांगड्या,१ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पेन्डल असे एकूण २ लाख २० हजार रुपयांचे दागिने घरातील दिवाणमध्ये ठेवले होते. रविवारी वटसावित्री पोर्णिमा असल्याने स्मिता या पुजेची तयारी करीत होत्या तर पती सकाळी ७ वाजता ड्युटीवर निघून गेले. पूजेसाठी जायचे असल्याने त्या दिवाणमध्ये ठेवलेले दागिने घेण्यास गेल्या असत्या त्यांना डब्यातील दागिने सापडले नाहीत, डबा रिकामा होता. त्यांनी पती शिंदे यांना प्रकाराबाबत माहिती दिली. ते ११.३० वाजता घरी पोहचले. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्राथमिक चौकशीवरुन एक महिला, तिचा पती व दोन मुली असे चौघांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव