बोदवड तालुक्यात वीज पडून दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:11 IST2018-06-23T13:10:34+5:302018-06-23T13:11:09+5:30

बोदवड तालुक्यात वीज पडून दोन ठार
बोदवड,. जि. जळगाव - बोदवड तालुक्यातील शेलवड व सुरवाडे या दोन गावात शेतशिवारात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान वीज पडून दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
शेलवड येथील जितेंद्र माळी (वय २८) व सोनाली नीलेश माळी हे शेतात असताना पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी या दोघांच्या अंगावर वीज पडून जितेंद्र हा जागीच ठार झाला तर सोनाली गंभीर जखमी आहे. तसेच तालुक्यातच सुरवाडे शेतशिवारात शेतात कुटुंबासह कपाशीशी लागवड करीत असताना शंकर प्रभाकर वाघ (वय ३२) यांच्या अंगावर वीज पडल्याने तेही जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.