Two killed in accident near Parola | पारोळ्याजवळील अपघातात दोन ठार
पारोळ्याजवळील अपघातात दोन ठार

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू ता.एरंडोल येथील पिक अप वाहनाने धडक दिल्याने दोन ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
शेवगे प्र.ब.येथील मीराबाई राजेंद्र महाजन या पती राजेंद्र धर्मा महाजन व तामसवाडी येथील कारागीर विजय नान्हू बेलदार यांच्यासह पारोळा येथे दातांच्या उपचारा साठी मोटरसायकल क्रमांक एम.एच १९ डब्लू ९६४६ ने येत होते. या दरम्यान समोरून येणाºया पिक अप जीप क्रमांक एम एच १९ बी.एम.३३२७ ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र धर्मा महाजन व विजय बेलदार हे जागीच ठार झाले तर मीराबाई यांच्या पायाला व डोक्याला जबर मार बसला आहे. त्यांच्यावर पारोळा येथे डॉ.योगेश साळुंखे यांच्याकडे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
दातांच्या उपचारासाठी जात असताना झाला अपघात
महाजन कुटुंब विजय बेलदार यांच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून पारोळा येथे दाताच्या उपचारासाठी येत होते. या दरम्यान हा अपघात झाला.
शेतकरी धावले मदतीला
अपघातानंतर आजू बाजूच्या शेतातील शेतकरी, वाहन चालक यांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मयताना बाहेर काढले. यावेळी दोन्ही मयत हे पिक अप वाहनाच्या मध्यभागी अडकल्याने ग्रामस्थांनी वाहन उलटे करून त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी मीराबाई यांना त्वरीत दुसºया वाहनाने रुग्णालयात हलविले.

Web Title: Two killed in accident near Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.