पारोळा येथे अक्षय्यतृतीयेला फळविक्रीतून आलेले दोन लाख ७० रुपये चोरट्यांनी लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:35 IST2018-04-19T13:35:59+5:302018-04-19T13:35:59+5:30

फळ विक्रेत्यावर संकट

Two hundred and sixty hundred thieves came from Parvola | पारोळा येथे अक्षय्यतृतीयेला फळविक्रीतून आलेले दोन लाख ७० रुपये चोरट्यांनी लांबविले

पारोळा येथे अक्षय्यतृतीयेला फळविक्रीतून आलेले दोन लाख ७० रुपये चोरट्यांनी लांबविले

ठळक मुद्देघराच्या गच्चीवर झोपलेले होते कुटुंबीयपोलीस दाखल

आॅनलाइन लोकमत
पारोळा, जि. जळगाव, दि. १८ - रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवर झोपलेले असताना घरात चोरट्यांनी प्रवेश करून दोन लाख ७० रुपये चोरून नेले. ही घटना बुधवारी मध्यरात्री पारोळा येथे मडक्या मारुती चौकात घडली.
या भागातील रहिवासी संजय मराठे हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. अक्षय्यतृतीयेला आंबे व इतर फळ विक्री केल्यानंतर आलेले २ लाख ७० हजार रुपये त्यांनी घरात लोखंडी कपाडात ठेवले होते. रात्री ते कुटुंबासह घरात झोपायला गेलेले असताना चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजा तोडून आत प्रवेश केला व पैसे घेऊन मागील दरवाजाने पसार झाले.
सकाळी घरातील गच्चीवरून खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

Web Title: Two hundred and sixty hundred thieves came from Parvola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.