जळगावात दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:45 IST2018-04-25T15:45:51+5:302018-04-25T15:45:51+5:30
सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

जळगावात दोन गटात जोरदार हाणामारी
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ : सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात शाहीद या तरुणाचे कुलर विक्रीचे दुकान आहे. त्याच्या दुकानासमोर विलास रतन राठोड, मनोज भटू गोसावी, संदीप अडकमोल व चंदू पांडे यांच्यात आपसात वाद व दगडफेक सुरू होती. शाहीद या तरुणाने चौघांना माझ्या दुकानासमोर वाद घालू नका, दुसरीकडे जा असे सांगितले असता या चौघांनी शाहीद यालाच मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या मदतीसाठी आलेल्या अल्ताफ यालाही त्यांनी मारहाण केली.
दोन जण फरार
हा वाद झाल्यानंतर शाहीद व त्याच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. दोन गटातील वाद व तणावाची स्थिती असल्याने पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजाराम पाटील, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व सतीश गर्जे यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात रवाना करून घटनास्थळ गाठले. तेथे लोकांची समजूत घालून वातावरण शांत केले.