धरणगाव तहसील कार्यालयातून पुन्हा दोन डंपरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:45 IST2019-03-13T22:45:25+5:302019-03-13T22:45:53+5:30
जप्त केलेले डंपर

धरणगाव तहसील कार्यालयातून पुन्हा दोन डंपरची चोरी
धरणगाव : वाळूचे जप्त केलेले दोन डंपर अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ६ मार्च रोजी अवैध वाळू वाहतूकदारांचे डंपर क्र.एम.एच. १९, जे २७७७ व एमएच १९, जे. ९६३९ हे दोन जप्त केले हौते. ते १० मार्चच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातून दोन ट्रक्टर व एक डंपरची चोरी झाली होती. त्यानंतर आता लगेच दोन डंपर चोरले गेल्याने महसूल प्रशासनाच्या कारभाराबाबत उलट-सूलट चर्चा सुरु आहे.