कंटेनरखाली दबल्याने अभियंत्यासह दोघांचा मृत्यू; एक कामगार गंभीर जखमी
By विलास.बारी | Updated: April 27, 2023 18:32 IST2023-04-27T18:32:28+5:302023-04-27T18:32:42+5:30
भुसावळ व जळगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार वारा व वादळ आले.

कंटेनरखाली दबल्याने अभियंत्यासह दोघांचा मृत्यू; एक कामगार गंभीर जखमी
जळगाव : भुसावळ व जळगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार वारा व वादळ आले. त्यात चिंचोली परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरु असलेल्या कामकाजाच्या ठिकाणी कंटेनर उलटल्याने त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची झाली.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीन ते सव्वा तीन वाजेच्या दरम्यान जोरदार वारा व वादळ सुरु झाले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेडचे पत्रे उडाल्याने मजूर व अभियंता मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या कंटेनरजवळ आले. मात्र वा-याचा जोर जास्त असल्याने रिकामे असलेले कटेनर उलटले. याखाली दबल्याने भोला पटेल (३०, रा.सनीकुआ, बिहार) व अभियंता चंद्रकांत वाभळे (मूळ रा.चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अफरोज आलम (रा.बिहार) हा गंभीर जखमी झाला. मयत व जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले होते.