रिक्षा उलटून सोयगाव तालुक्यातील दोन क्रिकेट खेळाडू ठार, ११ खेळाडू व चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:56 IST2018-03-24T13:56:30+5:302018-03-24T13:56:30+5:30
क्रिकेट स्पर्धेसाठी जात असताना उलटली रिक्षा

रिक्षा उलटून सोयगाव तालुक्यातील दोन क्रिकेट खेळाडू ठार, ११ खेळाडू व चालक जखमी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - पाचोरा तालुक्यातील पिंप्री-डांभुर्णी येथे क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट खेळाडूंची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात भरत शिवदास राठोड (२६), राहुल हरि जाधव (१९) हे दोन खेळाडू ठार झाले तर इतर ११ खेळाडूंसह रिक्षा चालक असे एकूण १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कवली- पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर झाला.
सोयगाव तालुक्यातील न्हावी तांडा येथून हे खेळाडू पाचोरा तालुक्यातील पिंप्री-डांभुर्णी येथे क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिक्षाने जात होते. रिक्षा कवली गावाच्या पुढे आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटून भरत राठोड व राहुल जाधव हे ठार झाले. तर चालकासह ११ खेळाडू जखमी झाले. जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयासह पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर येथे उपचार सुरू आहेत.