यावल येथे पाटाच्या पाण्यात दोन मुले बुडाली; सकाळपासून सुरु आहे शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 12:06 IST2021-05-06T12:03:21+5:302021-05-06T12:06:20+5:30
दोन दिवसापूर्वी हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

यावल येथे पाटाच्या पाण्यात दोन मुले बुडाली; सकाळपासून सुरु आहे शोध
जळगाव : हतनूर धरणाच्या पाटचारीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यावल येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
गणेश नीळकंठ दुसाने (सोनार) (१२) आणि दीपक जगदिश शिंपी (१४) अशी या मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी ते बोरावल रस्यावर असलेल्या हतनूर धरणाच्या पाटचारीत अंघोळीसाठी गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, गुरूवारी सकाळी नागरिकांच्या शोध मोहिमेत त्यांचे मृतदेह आढळले.
दोन दिवसापूर्वी हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटचारीत पाण्याचा प्रवाह मोठा आहे. दोन्ही बालके सरस्वती मंदिर शाळेचे विद्यार्थी होते.