अवैध गावठी हातभट्टी वाहतूक करताना दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:53 IST2020-05-08T21:53:40+5:302020-05-08T21:53:58+5:30
जळगाव : अवैध गावठी हातभट्टी दारू दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी ईच्छादेवी पोलीस चौकीजवळून शुक्रवारी सायंकाळी अटक ...

अवैध गावठी हातभट्टी वाहतूक करताना दोघांना अटक
जळगाव : अवैध गावठी हातभट्टी दारू दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी ईच्छादेवी पोलीस चौकीजवळून शुक्रवारी सायंकाळी अटक केली़ त्यांच्याजवळून तीन हजार रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
राकेश सुभाष शिंपी व कुणाल सुधाकर शिंपी-बागुल हे दोघं एमएच़१९़बीएऩ५४६७ क्रमांच्या दुचाकीवरून अवैध गावठी हातभट्टी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली़ त्यानुसार दोघांना अटक केली़ दारू तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे़ ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुज वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृृष्ण पाटील, नितीन पाटील, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी केली आहे़