बाधीत डॉक्टरांच्या घरी चोरी प्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:17 IST2020-06-07T17:17:42+5:302020-06-07T17:17:46+5:30
दोन लाख ८६ हजार ४००रुपयांची रोकड जप्त भुसावळ:- शहरातील खडका रोड भागातील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ...

बाधीत डॉक्टरांच्या घरी चोरी प्रकरणी दोघांना अटक
दोन लाख ८६ हजार ४००रुपयांची रोकड जप्त
भुसावळ:- शहरातील खडका रोड भागातील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ९० हजार ९०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या घरफोडीचा उलगडा केला असून एका आरोपीला अटक केली असून एका आरोपीच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघा संशयीतांच्या ताब्यातून दोन लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
आकाश सुरेश मोरे (२५ रा.घोडे पीर नगर, भुसावळ) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच दोन लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड तसेच संशयीत आरोपी दाऊद याचे वडील शेख महेबूब शेख इमाम (६० रा.दिनदयाळ नगर, भुसावळ) यांलाही अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दोघा आरोपींना तपासाकामी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र का.पाटील, हवालदार अनिल इंगळे, रमेश चौधरी, युनूस शेख,संतोष मायकल, रणजीत जाधव, राजेंद्र पवार यांनी केली.