Two and a half lakh worth of gambling was seized | जुगारावर धाड टाकून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगारावर धाड टाकून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा: सातगाव डोंगरी येथील जुगार अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धाड टाकून २ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
खडकी नदीच्या काठी जुगार अड्डा सुरू असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, ज्ञानेश्वर बोडके, माधुरी शिंपी आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अचानक धाड टाकली असता मधुकर शंकर पाटील (वय ४२, रा.शिंदाड), बाळू उगलाल निकम (वय ३० रा.जरंडी ता. सोयगाव), राकेश सुनील चौधरी (वय २२ रा. जरंडी, ता. सोयगाव), प्रकाश शिवदास चव्हाण (वय ४१, रा. वरसाडा तांडा) व एकनाथ भीमराव पाटील (वय ५०, रा. शिंदाड) अशा पाच जणांंना पत्ते खेळताना ताब्यात घेतले. तर राजू इसा तडवी रा. सातगाव हा फरार होण्यात यशस्वी झाला. याठिकाण ७ मोटरसायकल व रोकड रक्कमेसह २ लाख ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Two and a half lakh worth of gambling was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.