जीप व कालीपिलीच्या अपघातात १२ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:50 IST2019-05-12T17:50:48+5:302019-05-12T17:50:58+5:30
एरंडोल जवळील घटना

जीप व कालीपिलीच्या अपघातात १२ प्रवासी जखमी
एरंडोल - येथून जवळच राष्ट्रीय महामार्गावर काजू फॅक्टरी नजीक सकाळी १०.४५ वाजेच्याच्या सुमारास जीप व कालीपिली या दोन वाहनांचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले.
सर्व जखमींना एरंडोल येथे दोन खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एमएच १०/ सीएफ १३०० क्रमांकाची ही जीप पाळधी कडून एरंडोल कडे येत होती. तर एमएच १९ /वाय २०१९ क्रमांकाची कालीपिली एरंडोल कडून जळगाव कडे जात होती. तेव्हा हा अपघात झाला.
या अपघातात छाया शरद पाटील (शिरपूर), प्रभाकर दगडू पाटील (फागणे), मनिषा मनोज पाटील (जळगाव), दिपाली विजय जाधव (पारोळा), कैलास चौधरी (पारोळा), सोनाली प्रभाकर पाटील (फागणे), संगीता सोनवणे (पारोळा), सीता जगताप (पारोळा), वैशाली भामरे (पारोळा), कुणाल मोरे (नाशिक), पायल चौधरी (पारोळा), प्रतिभा चौधरी (पारोळा), इ. जखमी प्रवाशांची नावे रुग्णालयाच्या सूत्रांकडून समजली आहेत.