पाच लाखांसाठी विवाहितेच्या अंगावर घेतल्या चिमट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST2021-03-01T04:18:17+5:302021-03-01T04:18:17+5:30
जळगाव : दिराच्या लग्नासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी यास्मिनबी शेख वसीम (२०,रा.नंदुरबार ह.मु. शाहूनगर) या विवाहितेस सासरच्या ...

पाच लाखांसाठी विवाहितेच्या अंगावर घेतल्या चिमट्या
जळगाव : दिराच्या लग्नासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी यास्मिनबी शेख वसीम (२०,रा.नंदुरबार ह.मु. शाहूनगर) या विवाहितेस सासरच्या लोकांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण व अंगावर चिमट्या घेतल्याचा उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती वसीम शेख सत्तार, शेख सत्तार शेख इसार, शेख मशाद शेख सत्तार, शेख अझहर शेख सत्तार, सुमैय्या शेख सत्तार (सर्व रा.नंदुरबार) यांच्याविरुध्द रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : स्वातंत्र चौकात रात्री ११ वाजता दोन दुचाकींची धडक होऊन दुखापत केल्याप्रकरणी प्रशांत प्रल्हादराव आखातकर (३०, रा.अकोला,ह.मु.रामानंद नगर) याच्याविरुध्द रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २६ फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला होता व त्यात नचिकेत नंदकिशोर जाखेटिया (३१,रा.गुरुजी कॉलनी) हे जखमी झाले होते.
द्वारका नगरातून तरुणी बेपत्ता
जळगाव : द्वारका नगरातून १८ वर्षाची तरुणी कोणास काहीही न सांगता २७ रोजी सकाळी ८ वाजता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
चौघुले प्लॉट भागातून तरुण बेपत्ता
जळगाव : चौघुले प्लॉट भागातून पीतांबर उर्फ श्यामकांत गोकूळ दाभाडे (३४) हा तरुण २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर येथून तरुण बेपत्ता
जळगाव : शहापूर,ता.जामनेर येथून दीपक राजेंद्र सपकाळ (२९) हा तरुण २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेलेला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेंदालाल मिल भागातून तरुणी बेपत्ता
जळगाव : गेंदालाल मिल भागातून शबिना शेख मोहम्मद इकबाल (२८) ही तरुणी २९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली. या प्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार रईस शेख हे करीत आहेत.